विवेक तोटेवार, वणी: विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शाळा क्रमांक 8 तर्फे जनजागृती अभियान राबवण्यात आले. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पालकांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांकडून सेल्फी विथ माय फॅमिली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत भाग घेतलेल्या सर्व पालकांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. लकी पालकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. विशेष म्हणजे शाळा क्रमांक 8 मध्ये असलेल्या बुथ क्रमांक 143 येथे 80.79% मतदान झाले. वणी शहरातून हे सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर हे होते. बक्षीस वितरण वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी नितेश राठोड, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मनीषा शिवरकर व आयोजक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार हे होते.
सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी ईशा मानकर, कुमारी चतुरी डांगे व कु.आरोशी पुरी या विद्यार्थिनींनी बाबासाहेबांबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात गजराज परोथी, स्वरा गुरूनुले व डिंपल गुरनुले या विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. लकी ड्रॉमध्ये सतीश गुरनुले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर लक्ष्मण डांगे यांना द्वितीय व विनोद कळसकर यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक देवेंद्र खरवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अविनाश तुंबडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका सुनिता जकाते, किरण जगताप, निलिमा राऊत, छाया मांढरे मदतनीस निशा कावडे यांनी सहकार्य केले.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.