माळी समाज संघटनेची महिला कार्यकारिणी जाहीर

रिंकू मोहुर्ले यांची अध्यक्ष तर रेखा रासेकर यांची सचिवपदी निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: माळी समाज संघटनेच्या महिला कार्यकारीणीची निवड करण्यात आली. याबाबत शनिवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी दु. 3.30 वाजता वणीतील नगर वाचनालयाच्या पटांगणात सभा झाली. या सभेत महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली. रिंकू मोहुर्ले यांची अध्यक्ष तर रेखा रासेकर यांची सचिवपदी निवड कऱण्यात आली. निवडीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

सभेची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाला प्रमोद निकुरे, भास्करराव वाढई, मनीषा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी संघटनेत अधिकाधिक महिलांना जोडण्याचे तसेच समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. सभेत महिला कार्यकारिणीबाबत चर्चा झाली. चर्चेअंती महिलांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

संघटनेच्या रिंकू मोहुर्ले यांची अध्यक्ष तर रेखा रासेकर यांची सचिवपदी निवड कऱण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रीती गुरनुले, शोभा मोहुर्ले, संगीता वाढई, सहसचिव: जया सोनुले, कार्याध्यक्ष: रूपा कुरेकर, कोषाध्यक्ष: नंदा शेंडे, संघटक: विद्या मांदाडे यांची निवड कऱण्यात आली. तर शकुंतला शेंडे, रीमा सोनुले, किरण ढोले, संगीता निकोडे, रेखा शेंडे, मनीषा ठाकरे, वर्षा वाढई, जोत्स्ना वाढई, उषा लेनगुळे, माधुरी चौधरी, दीपा मांदाळे, निर्मला चौधरी, दीपा मांदाडे, दीपा गुरनुले यांची सदस्यपती निवड करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रत्येक वॉर्डातून दोन उपसचिव पदाचीही निवड करणार असे माळी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण निकोडे यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अमोल बोरुले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण निकोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार नवनिर्वाचित महिला अध्यक्ष रिंकु मोहुर्ले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सभेला मोठ्या प्रमाणात माळी समाजातील ज्येष्ठ महिला तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.