मोमिनपुरा येथे दोन गटात राडा: एकमेकांना हॉकी स्टिक, रॉडने मारहाण

दोन्ही गटाची एकमेकांविरोधात तक्रार, 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: मोमिनपुरा येथे बुधवारी रात्री दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटातर्फे एकमेकांना लोखंडी रॉड व हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटातील 14 लोकांवर विविध कलमानुसान गुन्हा दाखल केला. मारहाणीत एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले.

पहिल्या तक्रारीनुसार, तक्रारदार इमरान खान शादाब खान (36) हा मोमिनपुरा येथील रहिवासी आहे. तो विटाचा व्यवसाय करतो. व्यावसायिक कारणावरून त्याचा मोहम्मद कैफ मो. हाफिज खान (23) याच्याशी वाद झाला. बुधवारी संध्याकाळी मोहम्मद व त्याचे 6 जणांनी मिळून इमरानला लाथा बुक्क्यांनी व हॉकी स्टिकने मारहाण केली. इमरानच्या तक्रारीवरून कैफ हाफिज खान (34), सैय्यद रेहान सैय्यद एजाज (24), सैय्यद आयान सैय्यद एजाज (26), अफसर चिनी यासीन चिनी (30), अझहर चिनी यासीन चिनी (35), जमीर खान महेबुब खान (43), अयबाज खान अजीज खान (25) सर्व रा मोमीनपुरा यांच्यावर बीएनएसच्या कलम 118 (1), 189(2), 191 (2), 191(3), 190, 115 (2), 352, 351 (2), (3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुस-या तक्रारीनुसार, तक्रारदार मो. कैफ मोहम्मद हाफिज खान (23) हा गुलशन नगर वणी येथील रहिवासी आहे. त्याला इमरान खान शाबान खान (34), इस्माईल शादाब खान (40), छोटे खान शादाब खान (38), इरफान खान शादाब खान (32) व तीन अज्ञात आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व मारण्याची धमकी दिली. कैफच्या तक्रारीनुसार दुस-या गटातील 7 जणांवर बीएनएसच्या कलम 118 (1), 189(2), 191 (2), 191(3), 190, 115 (2), 352, 351 (2), (3), नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

Comments are closed.