विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

वणी-नांदेपेरा रोडवर कारवाई, चालकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर वणी पोलिसांनी पकडला. शनिवार दुपारी 1 वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा रोडवर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टर व रेती जप्त केली आहे. शनिवार 21 डिसेंबर रोजी वणी पोलिसांना रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून वणी पोलिसांनी 1 वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा रोडवर सापळा रचला. माहितीनुसार ट्रॅक्टर क्रमांक MH 29 AK 1809 व ट्रॉली क्रमांक MH 29 CB 8316 असलेला ट्रॅक्टर या मार्गावर आला. पोलिसांनी वाहन थांबवले असता या वाहनात 1 ब्रास रेती भरलेली होती. चालक गणेश नंदकुमार गोहोकार याला रेती परवण्याबाबात विचारणा केली असता परवाना नसल्याचे समजले. पोलिसांनी वाहन ताब्यात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

Comments are closed.