विवेक तोटेवार, वणी: गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा सोमवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी मृतदेह आढळला. अर्जून हरिभाऊ काळे (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वणीतील तेलीफैल येथील रहिवासी होता. तालुक्यातील रांगणा येथील नदी काठावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. अर्जूनचे आईवडील काही वर्षांपूर्वीच मरण पावले. तर एक भाऊ दोन वर्षांपूर्वीच मरण पावला. बहिणीचे लग्न झाल्यानंतर दोघे भाऊ सोबत राहत होते. अर्जुन हा मिस्त्री काम करून आपला उदरनिर्वाह करायचा. 18 डिसेंबर रोजी तो घरून निघून गेला. तो बुधवारी रात्री घरी परत न आल्याने दुस-या दिवशी याबाबतची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता अर्जुन कुठेही आढळून आला नाही. अखेर 23 डिसेंबर रोजी तालुक्यातील रांगणा येथील वर्धा नदीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अर्जूनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post
Comments are closed.