धाडसी घरफोडी, 2 लाख रुपयांची रोकड लंपास

पद्मावती नगरीत चोरट्यांनी मारला डल्ला, चोरटे पुन्हा सक्रिय

विवेक तोटेवार, वणी: ब्राह्मणी रोडवर असलेल्या पद्मावती नगरीमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी 1 लाख 92 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. फिर्यादी च्या तक्रारारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 दिवसांआधीच गुरुवर्य कॉलनी येथे चोरट्यांनी सुमारे 5 लाखांची घरफोडी केली होती. हे विशेष.

निखिल बाळकृष्ण झाडे (33) हे वणीतील पद्मावती नगरी येथे कुटुंबीयांसह राहतात. रविवारी दिनांक 22 डिसेंबर रोजी ते वैयक्तीक कामासाठी कुटुंबीयांसह बाहेर गावी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कुलूप कोंडा तोडलै. त्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट व सुटकेसमध्ये ठेऊन असलेल्या रोख रक्कमेवर चोरट्यांनी हात साफ केला. घराच्या वरच्या माळ्यावर निखिल झाडे यांची बहीण राहते. त्याच्याही घराच्या दाराची चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती.

सकाळी त्यांची बहीण झोपेतून उठली तेंव्हा तिला घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. तिने शेजाऱ्यांना फोन लावला. शेजारी जेंव्हा त्यांच्या घराकडे आले तेंव्हा त्यांना निखिल झाडे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. शेजारी व निखिल यांची बहिण घरी गेले असता त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती निखिल यांना दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निखिल घरी आल्यावर त्यांना कपाट व सुटकेसमधले एकूण 1 लाख 92 हजार रुपये नगदी चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळले. याबाबत निखिल झाडे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम 305(A), 331(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. याआधी

Comments are closed.