सेवन स्टार बेकरी फोडली, भूक लागल्यावर पिझ्झावर ताव…

वणीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच, आता मुख्य मार्केट टारगेटवर

विवेक तोटेवार, वणी: वणीतील गांधी चौकातील मुख्य मार्केटमध्ये असलेली सेवन स्टार बेकरी चोरट्यांनी मध्यरात्री फोडली. या चोरीत चोरट्यांनी 10 हजारांची रक्कम लंपास केली. शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास ही चोरी झाली. विशेष म्हणजे दुकानात मोठी रक्कम न मिळाल्याने चोरट्यांनी बेकरीत ठेवलेल्या पिझ्झा व समाोसाचा आस्वाद घेतला. चोरटे आधी वणीतील बंद घरे फोडत होते. मात्र चोरट्यांनी आता सुरक्षीत समजल्या जाणारे मुख्य मार्केट टारगेट केल्याने स्थानिक रहिवाशांसह आता व्यापारी वर्गही दहशतीत आला आहे.

वणीतील गांधी चौक येथे सेवन स्टार बेकरी आहे. गुरुवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता दुकान मालक फारुक हारून चिनी यांनी बेकरी बंद केली. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास बेकरीच्या मागच्या बाजूने एका चोरट्याने ग्रीलची सळाख वाकवून आता प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने आपला मोर्चा काउंटरकडे वळवला. मात्र काउंटरमध्ये 100, 50, 10 रुपये अशी चिल्लर रक्कम होती. चोरट्यांनी या चिल्लर रकमेवर (सुमारे 10 हजार) डल्ला मारला. काउंटरवर विशेष रक्कम न आढळल्याने चोरट्यांनी रागाच्या भरात दुकानातील सामान अस्तव्यस्त फेकले. भुक लागल्यामुळे त्याने पिझ्झा, समोसा व पनीर खाल्ले.  2 वाजताच्या सुमारास चोरटा मागच्या बाजूने पसार झाला.

सकाळी 9 वाजताच्या सुमारास बेकरी मालक फारुक चिनी हे दुकान उघडण्यास गेले. त्यांना दुकानातील सामान अस्तव्यस्त पडून असलेले दिसले. त्यांनी काउंटर बघितले असता काउंटरमधली चिल्लर रक्कम चोरट्यांनी नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच
वणीत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. या महिन्यातली ही तिसरी मोठी चोरी आहे. 6 डिसेंबरला चोरट्यांनी जिल्हा परिषद कॉलोनी येथे 5 लाखांचा घरफोडी केली होती. त्यानंतर चार दिवसांआधी पद्मावती कॉलोनीत चोरट्यांनी घरफोडी करीत 2 लाखांची रक्कम लंपास केली होती. आता चोरट्यांनी थेट वणीतील मुख्य मार्केट टारगेट केले आहे. येथे एक सेक्युरीटी गार्ड देखील सुरक्षेसाठी असतो. तसेच पोलिसांची देखील या भागात रात्री गस्त असते. मात्र याची भीती न बाळगता चोरट्यांनी मजल आता मुख्य मार्केट फोडण्याकडे गेली आहे. आधीच्या चोरीच्या एकाही गुन्हयाची उकल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सततच्या घरफोडीमुळे वणीकर दहशतीत आले आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.