रात्री जेवणानंतर फिरायला गेलेल्या वृद्ध महिलेला कारची धडक

महिला जखमी, भरधाव वाहन चालवणा-या तरुणांचा धुमाकुळ सुरुच

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री जेवणानंतर मुलीसह बाहेर फिरायला गेलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव कारने जबर धडक दिली. यात वृद्ध महिला जखमी झाली. वणीतील एसबी लॉन जवळ हा अपघात झाला. या प्रकरणी धडक देणा-या चालक तरुणाविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणीत तरुण वाहन चालकांचा धुमाकुळ सुरुच आहे. निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवण्यामुळे सातत्याने अपघात होत आहे. त्यामुळे वणीकरांची चिंता वाढली आहे.

तक्रारीनुसार, लीलाबाई शत्रुघ्न कोंगरे (65) या कनकवाडी येथील रहिवासी आहेत. त्या गुरुवारी दिनांक 2 जानेवारी रोजी जेवण झाल्यावर 9.30 वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी शिल्पा भारत मालेकर (42) यांच्यासोबत फिरायला गेल्या होत्या. फिरून घरी परतताना रात्री 10 वाजताच्या सुमारास एसबी लॉन समोर लीलाबाई यांना मागून एका लाल रंगाच्या इंडिका कारने (MH34-AA-5588) धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला, पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली.

अपघात होताच जखमी लीलाबाई यांच्या मुलीने चालकास मदतीसाठी थांबवले. मात्र चालक न थांबता भरधाव वेगाने तिथून निघून गेला. अपघाताची माहिती लीलाबाई यांचा मुलगा नितेश याला देण्यात आली. त्याने आईला वणीतील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर लीलाबाई यांचा मुलीने गाडीचा नंबर नोट केला होता. त्यावरून नितेश यांनी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी ओम गजानन वडे (22) रा. देशमुखवाडी या तरुणाविरोधात बीएनएसच्या कलम 281, 125(b) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

विकासकामांच्या श्रेयावरून आजी-माजी आमदार आमने-सामने

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.