उकणीजवळ आढळला मृत अवस्थेत पट्टेदार वाघ

नैसर्गिक मृत्यू की शिकार?

बहुगुणी डेस्क, वणी: उकणी खाण परिसरात आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सुमारे 10 दिवसांच्या आधी या वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वाघाचे दोन महिन्याआधी वेकोलि कामगारांना दर्शन झाले होते. त्यामुळे वेकोलि कामगार चांगलेच दहशतीत आले होते.

उकणी येथे कोळसा खाणीत मॉर्निंग शिफ्टचे कामगार ड्युटीवर जात होते. दरम्यान आरसी ऑफिस रोडजवळील बोअरवेलजवळ एका कर्मचा-याला कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आला. काही वेळातच ही वार्ता पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे या ठिकाणी बघ्याची एकच गर्दी जमा झाली. वनविभागालाही याची माहिती देण्यात आली.

सदर वाघ हा तीन ते चार वर्षांचा असून कुजलेल्या अवस्थेवरून या वाघाचा 10 दिवसांआधी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. वन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी मंदर येथे पाठवला. वाघाचा मृत्यू कसा झाला? किती दिवसांआधी झाला? नैसर्गिक मृत्यू आहे की शिकार या सर्व प्रश्नांची उकल उत्तरिय तपासणी अहवाल आल्यानंतर होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निंबाळा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर

 

Comments are closed.