शिरपूर रोडवर पिकअपची दुचाकीला धडक, चालक जखमी

शिरपूर येथे कामाला जाणा-या कारागिराचा अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: धोपटाळयावरून कामासाठी दुचाकीने शिरपूरला जाणा-या एका कामगाराला भरधाव पिकअपने समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल रमेश वासेकर (24) हा धोपटाळा येथील रहिवासी आहे. तो कार पेंटरचे काम करतो. त्याच्याकडे कामासाठी होन्डा शाईन ही दुचाकी (MH29-AV-7270) आहे. तो नेहमी कामासाठी त्याच्या दुचाकीने धोपटाळा ते शिरपूर अशी ये-जा करतो. सोमवारी दिनांक 6 जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे कामासाठी शिरपूर येथे जात होता. दरम्यान सकाळी 10 वाजताच्या सुमारास राहुलच्या दुचाकीला समोरून एका भरधाव विना नंबरच्या टाटा पिकअपने धडक दिली.

या धडकेत दुचाकी खाली पडली. या अपघातात राहुलच्या दोन्ही पायाच्या पोटरीला जबर मार लागला व डोक्याला मार ईजा झाली. अपघात होताच घटनास्थळावरून लोकांनी राहुलला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पिकअप चालक बबलू शेख इकबाल (35) रा. शिरपूर याच्या विरोधात बीएनएसच्या कलम 125 बी व 289 नुसार व मोटारवाहन अधिनियमच्या कलम 130, 139, 185, 50 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

निंबाळा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.