ग्राहकांचा रेस्टॉरन्टमध्ये धुडघुस, रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नीला मारहाण

6 ग्राहकांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वेटरशी वाद घालत असणा-या ग्राहकांना समजवण्यास गेलेल्या रेस्टॉरन्ट सांभाळणा-या महिलेला ग्राहकांनी शिविगाळ करीत मारहाण केली. शनिवारी रात्री बस स्टँडच्या बाजूला असलेल्या आस्वाद हॉटेलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी 6 आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, वणीतील बस स्टँडच्या बाजूला आस्वाद नामक एक रेस्टॉरन्ट आहे. प्रकाश परमजीतसिंग बग्गा यांचे हे रेस्टॉरन्ट असून शहरातील हे एक सुपरिचित रेस्टॉरन्ट आहे. रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नी ज्योती या पतीला रेस्टॉरन्ट सांभाळण्यास हातभार लावतात. शनिवारी दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री सव्वा 10 वाजताच्या सुमारास काही लोक तिथे जेवण करण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी ऑर्डर दिली व तिथून ते निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ते परत आले. यावेळी त्यांनी मद्य प्राशन केले होते, असा तक्रारदाराचा आरोप आहे. त्यानंतर ते ऑर्डरसाठी वेटरला त्रास देत होते. त्यांनी वेटरला शिविगाळ केली.

ग्राहक वेटरला शिविगाळ होत असल्याचे पाहून काउंटरवर असलेल्या रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नी ज्योती या ग्राहकांना समजवण्यास टेबलजवळ गेल्या. त्या समजवण्याच्या प्रयत्न करीत असताना ग्राहकांनी तिला दमदाटी करण्यास सुरुवात केली. दरम्यान एकाने तिला मानेवर जोरात थापड मारली. त्यामुळे ती क्षणात खाली कोसळली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

या प्रकरणी प्रकाश बग्गा यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी 6 जणांवर बीएनएसच्या कलम 189, 190, 115 (2), 351, 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय अश्विनी रायबोले या करीत आहे.

बदनामी का करतोय म्हणून विचारणा, एकाला बेदम मारहाण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.