पुरुषोत्तम नवघरे, वणी: धनोजे कुणबी समाज संस्था वणी द्वारा दिनांक 15 व 16 जानेवारी रोजी श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज मूर्ती स्थापना दिवस सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात भजन, ध्यान पाठ, पालखी सोहळा, घटस्थापना, मूर्ती अभिषेक, दहिहंडी, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांसह वणी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मंगेश रासेकर हे होते.
बुधवार दिनांक 15 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता वारकरी भजन मंडळ वणी तर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. 16 जानेवारीला ध्यान पाठ व भजन, श्री चा पालखी सोहळा, घटस्थापना व श्रीच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिखलगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली कातकडे, एकविरा महिला पतसंस्था मारेगावच्या अध्यक्षा किरण देरकर, चिखलगावचे उपसरपंच सुनिल कातकडे यांचा देखील जाहीर सत्कार घेण्यात आला.
यासह गुरूदेव सेवा भजन मंडळ यांचा कार्यक्रम, ह.भ.प. मनुमहाराज तुगनायत यांचे प्रवचन, दही हांडी काला व महाआरती, भजन संमेलन, महाप्रसाद व समारोपीय भजन आरती असा दिवसभराचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेवराव जेनेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अंबादास वागदरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. अनिलकुमार टोंगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव रामराव लेडांगे, उपाध्यक्ष प्रमोद वासेकर, कोषाध्यक्ष रामराव गोहोकार, प्र. मार्गदर्शक अभय पानघाटे संचालक, कुंडलिक ठावरी, भास्कर सोमलकर, नितीन मोवाडे, सुरेश राजूरकर, राघवेंद्र कुचनकर, राजेश पहापळे, शैलेश ढोके, शांताराम राजूरकर, आशिष मोहीतकर, अँड घनश्याम निखाडे, घनश्याम चोपने तसेच
योगा समितीचे सदस्य दिगंबर गोहोकर, सुरेश रायपूरे, जयप्रकाश राजूरकर, समाजभवनाचे व्यवस्थापक कवडु नागपुरे, किशोर मिलमिले, वसंतराव उपरे, सुधाकर गारघाटे, गुलाबराव आवारी, नरेंद्र मिलमीले, नारायन ढवस, भैय्याजी तेजे, प्रभाकर गौरकर, प्रियंका मंगेश रासेकर, रामचंद्र पिपराडे, नरेंद्र चिकटे, राजेन्द्र विधाते, विलास बिलगैय्ये, संजय बोंडे, हार्दिक किनाके, सौ. शारदा गोहोकार, काजल नागपूरे इत्यादींनी परिश्रम घेतले.
Comments are closed.