तब्बल 6 म्हशींना रेल्वेने चिरडले, गणेशपूर जवळील घटना

रुळावर मांसाचा सडा, सर्व म्हशींचा जागीच मृत्यू,.. पशूपालकाचे मोठे आर्थिक नुकसान

बहुगुणी डेस्क, वणी: कोल्हापूर- धनबाद एक्सप्रेसने 6 म्हशींना चिरडले. सर्व म्हशींचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास गणेशपूर जवळील छोरिया ले आऊट जवळ ही घटना घडली. दुपारीकोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस ही कोल्हापूरच्या दिशेने जात होती दरम्यान गणेशपूर जवळील रेल्वे रुळाजवळ एका पशूपालकाच्या 6 म्हशी चरत होत्या. दरम्यान या म्हशी अचानक रेल्वे रुळावर गेल्या. दरम्यान गुराख्याच्या ही बाब लक्षात आली नाही. याच वेळी भरधाव वेगाने दीक्षाभूमी एक्सप्रेस ही नागपूरहून अदिलाबादच्या दिशेने जात होती. या भरधाव रेल्वेने एका क्षणात रुळावरील सर्व म्हशींना धडक दिली. या धडकेनंतर रुळावर मांसाचा सडा झाला होता. तर काही म्हशी मृत अवस्थेत रुळाच्या बाजूला पडल्या. या अपघातात सर्व म्हशींचा मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच घटनास्थळी गणेशपूर येथील नागरिकांनी गर्दी केली होती. एकाच वेळी 6 म्हशींचा मृत्यू झाल्याने पशू पालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

रंगारीपुरा येथील तरुणाने घेतला गळफास

मुजोर कंपनीने 65 भूमिपुत्रांना नोकरीवरून काढले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.