वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तवणूक, इसमावर गुन्हा दाखल
वणी/विवेक तोटेवार: सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वणीतील टिळक चौकात आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावीची केल्याबद्दल दोघांवर कलम 353 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वणीमध्ये टिळक चौकातून एकमार्गी वाहतूक असल्याने त्या ठिकाणी सकाळी 9.30 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक कर्मचारी अपघात होऊ नये म्हणून व नियमाचे पालन व्हावे याकरिता कर्तव्यावर असतात. सकाळी 11 वाजताच्या सुमारास मोपेड वाहन क्रमांक एम एच 29 बी बी 0850 नियम तोडून विरुद्ध दिशेने तसेच ट्रिपल सिट बसून येत असल्याने वाहतूक कर्मचारी अनिल सकवान यांनी वाहन थांबवून त्यांना दंड भरण्यास सांगितले. परन्तु त्यांच्याकडे पैसे नसल्याचे पोलिसांनी वाहन वाहतूक शाखा येथे घेऊन जा असे म्हटले. सकवान यांनी आपले वाहन त्याच ठिकाणी ठेऊन मोपेड वाहन वाहतूक कार्यालयात आणले तसेच तिन्ही इसमास आपल्या पालकांना घेऊन येण्यास सांगितल ेव पुन्हा टिळक चौकात आपल्या कर्तव्यावर परत आले.
त्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांच्या दुचाकू वाहनाच्या दोन्ही टायरमधील हवा सोडल्या गेल्याचे समजले. त्यांनी विचारपूस केली असता ज्यांचे वाहन तुम्ही घेऊन गेले त्यांनीच तुमच्या गाडीची हवा सोडली ही माहिती मिळाली. थोडा वेळात आरोपी नुरूल अमीन खान युसूफ खान वय 44 वर्ष राहणार टिळक चौक व गाडी चालवणाऱ्या मुलगा राहणार मोमीनपुरा यांनी टिळक चौकात येऊन सकवान याना शिवीगाळ केली व आम्ही दंड भरणार नाही. तुमच्याने जे होते ते करा. अशी धमकी दिली असता सकवान व त्यांच्यासोबत कर्तव्यावर असणारे वाहतुक पोलीस निलेश कुंभेकर यांनी त्या दोन्ही आरोपीस वाहतूक शाखेत आणले.
त्या ठिकाणीही दोन्ही आरोपी अरेरावी करीत होते. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यावरून त्यांच्यावर भा द वि कलम 353,34 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस कान्स्टेबल आनंद अलचेवार करीत आहे. संध्याकाळी दोन्ही आरोपीला न्यायालयातून बेल मिळाली होती.