पंचायत समिती तर्फे जागतिक महिला दिन साजरा
सुशिल ओझा, झरी: महिलांनी सभा व मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येऊन सक्षम व्हावे तर शासनाने महिलांसाठी अस्थितवात आणलेला योजनांचा योग्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई व सभापती लताताई आत्राम यांनी केले. पंचायत समिती झरीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुकुटबन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजराजेस्वर मंदिरातील सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला बचत गटातील तसेच गावातील ६०० ते ७०० महिलांनी हजेरी लावली होती. यात महिलांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक शिवाजी गवई आणि लताताई आत्राम म्हणाल्या की आजची महिला ही संस्कारित, सुशिक्षित व अडचणींवर मात करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन चालणारी आहेत. आजच्या काळात महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण झाल्याशिवाय महिलात धाडस निर्माण होत नाहीत. महिलांनी शासनाच्या प्रत्येक कार्यात अग्रेसर राहून कार्य करावे.
या कार्यक्रमात झरीजामनी पंचायत समितीचे अधिकारी सुभाष चव्हाण यांचेसह गटविकास अधिकारी शिवाजी गवई तर, प्रवीण कडुकर, ग्रामविकास अधिकारी विजय उईके, प्रशांत डोनेकर, युनूस बसरोदिन, गणेश मुके, संजय पारशिवेंआदींनी सहकार्य केले.