अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिल्याच्या रागातून मारहाण

ग्रामपंचायत सदस्याला मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याच्या रागातून एकाने ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण करीत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. तालुक्यातील सोमनाळा येथे गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी निंबाळा येथील मनोज रामदास ढेंगळे (42) यांच्या तक्रारीवरून आरोपी आशीष विठ्ठल घुगूल (35) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, मनोज ढेंगळे हे निंबाळा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सुनिता मनोज ढेंगळे गट. ग्रा. पं. सोमनाळा निंबाळाच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने 15 दिवसांपूर्वी सोमनाळा येथील रहिवासी असलेल्या विठ्ठल घुघूल यांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दिली होती. गुरुवारी सकाळी ढेंगळे हे सोमनाळा येथे ग्रा.पं.च्या वतीने संडासचे सुरु असलेले बांधकाम पाहण्यासाठी एका सहका-याच्या दुचाकीवर गेले. बांधकाम पाहून ते परत येत होते. दरम्यान सोमनाळा येथील पिंटू ढोके यांच्या घराजवळ सार्वजनिक रोडवर उभे राहून त्यांच्या एका परिचितांशी ते बोलत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सकाळी 10 वाजताच्या सुमारास सोमनाळा येथील आशीष विठ्ठल घुगूल (35) हा त्यांच्याजवळ आला. तो ढेंगळे यांच्यासोबत वाद घालू लागला.आशीषने त्याच्या घरासमोरील नालीचे बांधकाम कधी करणार आहे, असे विचारले व शिविगाळ करीत ढेंगळे यांना थापड, बुक्यांनी यांना मारहाण केली. जर त्याच्या घरासमोरील नाली बांधली नाही, तर पुन्हा मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे जिवीतास धोका असल्याच्या कारणावरून ढेंगळे यांनी पोलीस स्टेशनला गाठले व आरोपी आशीष विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 351(2), 296 व 115(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

एकाच व्यक्तीचे दोन्ही घरं फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड

Comments are closed.