बहुगुणी डेस्क, वणी: ते चचा 50 वर्षांचे आहे. त्यांचा डोळा एका ४० वर्षीय विवाहित महिलेवर होता. तो नेहमीच तिला छेडायचा. चचा अध्ये मध्ये तर हिन्दी सिनेमातल्या रंजीत, शक्ती कपूर सारखे डॉयलॉग मारून छेड काढायचा. एक दिवस तर चचाने हद्दच केली. ऐ जाने मन… मै तेरे से शादी करता हू… तू तेरे पती और बेटी को छोड दे… असे फिल्मी डॉयलॉग मारून चचाने महिलेसमोर नवीनच ऑफर ठेवली. आपलं कोणी काही बिघडवेल असं चचाला कधीच वाटत नाही.
चाचाचे वय जरी 50 च्या आसपास पोहोचले असले तरी चचामध्ये प्रेमाचा चांगलाच जोश होता. महिला भाव देत नसल्याने चचाने आपला मोर्चा आता तिच्या 24 वर्षीय मुलीकडे वळवला. त्याने त्या महिलेच्या मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. एके दिवशी असेच अंगात फिल्मी विलन आणून चचाने महिलेच्या मुलीला डोळा मारला. मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे इशारे केलेत. शिवीगाळही केली. चचाचे नेहमीचे फिल्मी आणि वासनांध चाळे पाहून शेवटी त्या महिलेचा पारा भडकला. तिने पोलीस स्टेशन गाठले.
महिलेने वणी पोलीस ठाण्यात त्याची तक्रार नोंदवली. आतापर्यंत डॉयलॉग मारणा-या चचाच्या पोटात आता मात्र भीतीचा गोळा उठला. पोलिसांनी आरोपीवर कलम 74, 75, 352 BNS अन्वये गुन्हा दाखल केला. युसुफ खान सुबेदार खान (50) रा. इंदिरा चौक वणी असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोउपनि सुदाम आसोरे करत आहे.
Comments are closed.