पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवारी दिनांक 20 फेब्रुवारी पासून वणतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात रात्रकालीन सिक्स ए साईड क्रिकेटचा थरार रंगणार आहे. चार दिवस रंगणारी ही स्पर्धा 5 ओव्हरची असून फायनल मॅच सात ओव्हरची राहणार आहे. स्पर्धेत बक्षिसांची मोठ्या प्रमाणात लयलूट राहणार आहे. या स्पर्धेचा थरार वणीकरांनी अवश्य अनुभवावा, असे आवाहन आयोजक नृसिंह स्पोर्टिंग क्लब द्वारा करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या विजेत्याला रोख 30,000 रुपये, उपविजेत्याला 20,000 रुपये तर तृतिय क्रमांकावर असलेल्या संघाला 10 हजारांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. यासह मॅन ऑफ द सिरीज म्हणून दीड हजार तर बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅस्टमन यांना रोख हजार रुपये तर बेस्ट किपरला रोख 500 रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. गुरुवारी दिनांक 20 फेब्रुवारीला संध्याकाळी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर रविवारी रात्री या स्पर्धेची सांगता होणार आहे.
उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष तारेंद्र बोर्ड तर उद्घाटक अॅड. कुणाल चोरडिया व मिनाज शेख हे राहणार आहेत. कार्यक्रमाला किशोर वावणे, शंकर झिलपे, इजहार शेख, डॉ. अनिरुथ वैद्य, जितेंद्र डाबरे, नंदकिशोर गंगशेट्टीवार, प्रमोद इंगोले, बाबुलाल पोटदुखे, पुरुषोत्तम आक्केवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नृसिंह स्पोर्टिंग क्लब व नृसिंह व्यायामशाळेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे.
Comments are closed.