निळापूरचं असं कसं झालं काळापूर? लोक रागाने लाल-पिवळे

शिवसेनेचे (उबाठा) PWD आणि वेकेलिला निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या निळापूर गावाच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे ठिकठिकाणी पडले आहेत. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ तसेच सामान्या नागरिकांना याचा अतोनात त्रास होत आहे. त्यात भर म्हणजे वेकोलिच्या कोळसा वाहतुकीने दिवसेंदिवस प्रदूषणात भर पडत आहे. शेतीप्रिय असा हा परिसर आहे. मात्र कोळशाच्या धुळीने निळापूर हे आता ‘काळापूर’ झालं आहे. यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने नागरिक मात्र रागाने ‘लाल-पिवळे’ होत आहे. याचीच दखल शिवसेनेने (उबाठा) घेत आवाज उठवला आहे.

निळापूर ते ब्राह्मणी हा रस्ता PWD विभागाच्या अखत्यारीत येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार WCL भालर, वणी नॉर्थ एरियाला हस्तांतरित करण्यात आलेला आहे. या रस्त्याचे काम होऊन जेमतेम एक वर्षच झाले. मात्र एवढ्या कमी कालावधीतच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे रात्री बेरात्री या रस्त्याने प्रवास करताना बऱ्याच लोकांचे अपघात होत आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे (उबाठा) उपतालुका प्रमुख मनोज ढेंगळे उपविभागीय अभियंता सार्व. बांध. उपविभाग वणी यांना भेटलेत. तसेब वेकोलि वणी नॉर्थ एरिया भालर, सिविल विभागाचे एस. ओ. चिन्ना रेड्डी यांना फोनवरून ही तक्रार दिली. त्यात लवकरात लवकर खड्डे बुजवून देण्याची मागणी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच उपविभागीय अभिभंता सार्व. बांध. उपविभाग तसेच वे. को. ली. वणी नॉर्थ एरिया भालरचे चिन्ना रेड्डी यांना पुन्हा स्मरण करून दिले. दोघांनाही व्हाट्‌सअॅपवर खड्ड्यांचे फोटो पाठवले. लोकेशन बघून कारवाई करतो असे चिन्ना रेड्डी फोनवर बोलले. परंतु एक महिना झाला तरी अजूनही हे खड्डे बुजवून देण्यात आले नाहीत. या रस्त्याने WCLकर्मचारी, शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना रात्रीबेरात्री प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळेस WCLची मोठमोठी अवजड वाहने कोळसा वाहतूक करतात. त्या वाहनांच्या लाईटचा उजेड डोळ्यावर वर पडून बऱ्याच प्रवाशांना अपघात होत आहेत. परंतु दोन्ही विभागांद्वारे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही. तत्काळ कार्यवाही केली जात नाही.

WCL व कोलवाशरीद्वारे यामार्गे मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक केली जाते. कोळसा ओव्हरलोड भरलेला असल्यामुळे खड्ड्यातून वाहन आदळल्यावर बराच कोळसा रस्त्यावर पडतो. त्या कोळशावरून वाहनांची चाके जाऊन तयार झालेली धूळ कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे परिसरात पसरली जात आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना व प्रवास करणाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. खास करून ब्राह्मणी फाट्यावर कोळशाच्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना तर तिथे एसटी बसची वाट पाहताना बराच वेळ धुळीत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत.

निवेदन मिळताच 08 दिवसांच्या आत या मार्गारील सर्व खड्डे चांगला दर्जा राखून बुजवण्यात यावे आणि वारंवार खड्डे पडू नये म्हणून या मार्गावरील ओव्हरलोड वाहतूक तत्काळ धांबवण्यात यावी. तसेच कोळशाच्या धुळीमुळे परिसरात होत असलेल्या प्रदूषणावर तत्काळ उपाययोजना करून प्रदूषण नियंत्रणात आणावेत. अशी मागणी होत आहे.

या मागण्या मान्य न झाल्यास कसलीही पूर्वसूचना न देता परिसरातील सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यादरम्यान कसलीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उपरोक्त दोन्ही विभागांची राहील अशीही चेतावणी दिली आहे. या निवेदनाची प्रतिलिपी आमदार प्रतिलिपी आमदार संजय देरकर,जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता साबांवि, कार्यकारी अभियंता साहेब, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी वणी, महामिनरल मायनिंग बेनिफिसिएशन प्रा. लि. पिंपळगाव, यांना दिली आहे.

Comments are closed.