विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाचा विवाह एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लावण्यात आला. पतीने बळजबरीने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले. मुलीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर बालविवाहाचे बिंग फुटले. पीडीतेच्या तक्रारीवरून पती तसेच मुलीच्या आई वडिलांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम पतीला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पीडिता (15) ही मुळची उत्तर प्रदेश येथील आहे. ती तिच्या आईवडिलांसह राजूर (कॉ.) येथे राहते. तिचे आई वडिल मजुरी करतात. तर आरोपी (25) हा राजूर कॉ. येथील रहिवासी असून तो येथेच काम राहतो. 23 जून 2023 रोजी पीडिता ही 13 वर्षांची असताना तिचा उत्तर प्रदेश येथे जाऊन आरोपीशी विवाह लावून देण्यात आला. हा विवाह लावण्यात पीडितेच्या आई व वडिलांनी पुढाकार घेतला. आरोपी पतीने लग्नानंतर पत्नीला उत्तर प्रदेश येथून घेऊन राजूर येथे आले. तो तिच्या सोबत राहू लागला.
मुकेशला पीडिता ही अल्पवयीन असल्याची माहिती होती. मात्र तरी देखील त्याने पीडीतेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ती गर्भवती राहिली. शनिवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी पीडितेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तिला वणीच्या ग्रामीण रुग्णालामध्ये दाखल करण्यात आले. तिने एका बाळाला जन्म दिला. दरम्यान मुलीच्या वयाबाबत डॉक्टर व नर्सला संशय आले. त्यांनी अधिक विचारणा केल्यानंतर बालविवाहाचे बिंग फुटले. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता यात तथ्य आढळून आले.
पोलिसांनी आरोपी पती विरोधात भांदविच्या कलम 376 (2) (N) व 4, 6 पोक्सो व बालविवाह विरोधी कायद्याच्या कलम 9, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेतील इतर आरोपी असलेले पीडित मुलीचे आई वडील यांना अद्याप अटक झालेली नाही. घटनेचा तपास सपोनि निलेश अपसुंदे करीत आहे.
महाराष्ट्र, भारत आणि देशाबाहेरही युवकांना रोजगाराची संधी- एसडीपीओ गणेश किंद्रे
Comments are closed.