भरधाव कारची रस्ता ओलांडणा-याला धडक, तरुणाचा मृत्यू

संविधान चौकात सातत्याने अपघात... बनला यमलोकाचे द्वार

बहुगुणी डेस्क, वणी: गुंजच्या मारोतीजवळ रस्ता क्रॉस करणा-या एका तरुणाला भरधाव कारने जबर धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा  अपघात झाला. विजय आत्राम ( वय अंदाजे 43) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दामोदर नगर येथे राहत होता. तो घुग्घुस रोडवरील टोल नाक्यावर काम करीत होता. टोल घराच्या काही अंतरावरच असल्याने विजय पायीच कामाला जायचा. शनिवारी तो नेहमीप्रमाणे सकाळच्या शिफ्टला गेला होता. शिफ्ट संपल्यानंतर तो घरी दामोदर नगर येथे परतत होता. संविधान चौकाजवळून तो दामोदर नगरकडे रस्ता ओलांडत होता. दरम्यान वरो-याकडून वणीच्या दिशेने येणा-या एका भरधाव कारने धडक दिली. अपघातात विजयच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. विजयला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. रविवारी विजयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचा आधार हरवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या चौकात सातत्याने अपघाताच्या घटना होत असल्याने हा चौक यमलोकाचे दार बनले आहे.  

13 वर्षीय मुलीचा विवाह, वासनांध पती गजाआड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

क्लासच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली मुलगी परतलीच नाही

Comments are closed.