लगीनगाठ, एमपीएल क्रिकेट सामने आणि रंगलेत विविध कार्यक्रम

शिवजयंती महोत्सवात खा. प्रतिभा धानोरकर व आ. संजय देरकर यांनी साधला संवाद

बहुगुणी डेस्क, वणी: वर्षातला सर्वात मोठा उत्सव शिवजयंती संपूर्ण विश्वात उत्साहात साजरा झाला. मोहदा येथेदेखील त्यानिमित्त विविध कार्यक्रम झालेत. त्यात लक्षवेधी ठरला सामूहिक विवाह सोहळा आणि एमपीएल क्रिकेट सामने. या कार्यक्रमांना खा. प्रतिभा धानोरकर व आ. संजय देरकर यांनी हजेरी लावत उपस्थितांशी संवाद साधला. खा. धानोरकर म्हणाल्यात की, शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. सामूहिक विवाह मेळाव्यातून समाजाची आर्थिक बचत होते. तो सर्व घटकां संपन्नेतेकडे नेण्यास उपयुक्त ठरतो. आमदार संजय देरकर यांनी सामूहिक विवाह मेळाव्याचे महत्त्व यावेळी विषद केले. ते म्हणाले की, सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. त्यासोबतच शिवजयंतीनिमित्त असेच विविध सामाजिक उपक्रम राबविता येतील असंही देरकर म्हणालेत. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य मोहदा येथे विविध क्षेत्रांतील गुणवंत आणि कर्तृत्त्ववान व्यक्तिंचाही सत्कार यावेळी झाला. एमपीएल म्हणजेच मोहदा प्रीमिअर लीगने तर धमालच केली. या क्रिकेट सामन्यांत आपल्या खेळाच्या स्टाईलची चुणुक स्थानिक खेळाडुंनी दाखवली. या विविधारंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे होते. त्यांनी मोहदा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बांधील राहतील असा विश्वास दिला. मोहदा गावातील कार्यकर्ते व गावकरी यांचे या उपक्रमांबद्दल अभिनंदन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विचारपिठावर खासदार प्रतिभा धानोरकर, वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, संभाजी ब्रिगेड वणी तालुकाधक्ष गणेश बोंडे, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे, वामन कुचनकर, गौतम सुराणा, ज्ञानेश्वर येसेकर, खलील शेख, मनीषा कनाके प्रमुख पाहुणे म्हूणन उपस्थित होते. जिजाऊ वंदना, स्वागतगीत, छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत, दीप प्रज्वलन, पाहुण्यांचे स्वागत आणि मार्गदर्शनपर भाषण असा विविधांगी कार्यक्रम झाला. सामुदायिक जोडप्यांचे मंगलाष्टक, वाजंत्रींनी थाटात लग्न झालेत. नवीन जोडप्यांना गिफ्ट देण्यात आलेत . सर्वांनी जेवण्याचा आस्वाद घेतला. मोहदा गावाच्या महिलांनी चांगलीच हजेरी लावली. वृद्ध, बालगोपालांनी आनंद लुटला.

आयोजकांनी नवीन सामुदायिक विवाह संकल्पना साकार केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता डोहे, प्रास्ताविक गणेश बोन्डे व आभार प्रदर्शन आशीष रिंगोले यांनी केले. या सोहळ्यासाठी संभाजी ब्रिगेड, छत्रपती महोत्सव समिती व मोहदा ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यामानाने या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम वाघमारे, मनोज उरकुडे, विशाल कुचनकर, श्रीकांत कुचनकर, हरिदास केळझरकर, राजकुमार वडस्कर, वामन उईके, गजानन शेलवडे, अर्चना गेडाम, बेबी उइके, सीमा ढूमणे, सुवर्णा बोंडे, शोभा टेकाम, ओमप्रकाश नक्षणे, अमोल शेलवडे, वैभव मडावी, अमोल पुनवटकर, रमण मेश्राम, रमण कुचनकर , राहुल पावडे , संदेश शंभरकर , श्रीकांत देठे , विनीत कुचनकर , स्वप्निल बोथले, रूपेश खुसपुरे, आशीष शेलवडे इत्यादींनी कार्यक्रमास सहकार्य केले.

Comments are closed.