38 बेवारस वाहनांचा लिलाव, मंगळवारी लागणार बोली…

पोलिसांनी जप्त केलेले वाहन खरेदी करण्याची सर्वसामान्यांना संधी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दारू पिऊन गाडी चालविणे, चोरी किंवा अन्य गुन्ह्यांत वाहने जप्त होतात. ही वाहने मग पोलीस ठाण्यात जमा करतात. त्यानंतर एका ठराविक काळापर्यंत वाहनाचे मालक दावा करण्याची वाट पाहतात. नंतर कोणी दावा करणारे आले नाही तर त्याचा लिलाव होतो. असाच शिरपूर पोलीस ठाण्यातील वाहनांचा आणि लोखंडी भंगाराचा लिलाव ४ मार्चला होत आहे.

शिरपूर पोलीस ठाण्यातील अभिलेखावर 36 दुचाकी, 1 चारचाकी व 1 तीन चाकी अशी एकुण 38 बेवारस वाहने व पोस्टे आवारातील लोखंडी भंगार आहे. या बेवारस मालाबाबत वणी उपविभाग दंडाधिकारी यांच्या लेखी आदेशाने तसेच दारुबंदी गुन्ह्यांतील निकाली गुन्ह्यांतील मोटर सायकल 31 व 3 चार चाकी वाहने अशी एकुण 34 वाहने ही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वणी यांच्या अंतिम निकालानुसार, वाहनांचा जाहीर लिलाव दिनांक 4 मार्च रोजी होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुकांनी दिनांक 04 मार्च रोजी सकाळी 7 वाजता या निवीदांसह व स्क्रॅप मर्चंट लायसन्ससह पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहावे. निविदा सकाळी 07.00 ते 10.00 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. जाहीर लिलाव हा वणीचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली, शिरपूरचे ठाणेदार व यवतमाळ परिवहन अधिकारी यांच्या समितीसमक्ष दिनांक 4 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात येईल. अशी माहिती शिरपूर पोलिसांनी कळवली आहे. 

Comments are closed.