व्यावसायिक अरुण बिलोरिया यांचे निधन

आज दु. 2 वा. रविनगर येथील घरून निघणार अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: रवी नगर येथील रहिवासी असलेले परिसरातील सुपरिचित व्यावसायिक अरुण बिलोरिया यांचे सोमवारी दिनांक 3 मार्चला रात्री साडे 11 वाजता निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होता. उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सुस्वभावी आणि मनमिळाऊ अशी त्यांची ओळख होती. साऊंड, डेकोरेशन, बिछायत, कॅटरिंग अशा विविध व्यवसायांत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने बिलोरिया परिवारासह सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा दर्शन, मुलगी वैष्णवी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर आज मंगळवार दिनांक 4 मार्चला दोन वाजता अंतिम संस्कार होतील. अंतिम यात्रा रवी नगर येथील त्यांच्या घरून निघेल. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Comments are closed.