आपण सासूला कधी समजून घेतलं आहे काय?
महिलादिनाला ८ मार्च रोजी वैद्य सुवर्णा चरपे करतील उलगडा
बहुगुणी डेस्क, वणी: सासु-सुनेचं नातं हे नेहमीच चर्चेत असतं. नवरा असो की बायको असो, दोघांनाही शक्यतो सासू असते. ही भावनिक नात्यांची बांधीलकी फार गुंतागुंतीची तर कधी खूप सहज असते. ‘सासू समजून घेताना’ आनंदही होतो. तर बऱ्याचदा भावनिक घालमेलही होते.
अनेक न्यूज चॅनेल्स सासू-सुनेच्या सिरीयल्सनी फुललेले असतात. मात्र सासू कशी समजून घ्यावी यावर विशेष चर्चा होत नाही. म्हणूनच शनिवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिलादिनानिमित्त विशेष व्याख्यान होत आहे. व्याख्यानाचा विषय ‘सासू समजून घेताना’ असा आहे. आयुर्वेद तज्ज्ञ तथा नियमित स्तंभलेखिका व कवयित्री वैद्य सुवर्णा चरपे सोनार ह्या विषयाची मांडणी करतील.
नगर वाचनालय आणि श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्राने या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. व्याख्यानाच्या अध्यक्ष भारती मा. सरपटवार असतील. हे व्याख्यान नगर वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी 7 वाजता होईल. सर्वांनी या व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे
Comments are closed.