नांदेपेरा रोडवर आग… चहाची टपरी, झाडं जळाली

संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास लागली आग

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नांदेपेरा रोडवर आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आग लागली. या कोणताही जीवित हानी झाली नसली तरी आगीत एक कॅन्टीन जळाली. तसेच काही झाडांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. यावेळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच आगीमुळे या रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवर रेल्वे फाटकापासून जवळच असेलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत आग लागली. आग वाढत गेली. दरम्यान या आगीच्या कवेत रस्त्याच्या कडेला असलेली एक चहाची टपरी आली. तसेच मैदानातील काही झाडे व झुडपे जळाली. घटनेची माहिती फायरब्रिगेडला देण्यात आली. माहिती मिळताच फायर फायटर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सिगारेट किंवा कचरा जळाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. फायर ऑफिसर नंदू बेलसरे यांच्या मार्गदर्शनात फायर फायटर दीपक वाघमारे, आयुतोष जगताप, प्रितेश गौतम, शुभम टेकाम व वाहनचालक देविदास जाधव यांनी आग आटोक्यात आणली. आग विझवताचे कार्य सुरु असल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

दारु तस्कराने उडवले 4 वर्षांच्या चिमुकलीला, चुटकीचा मृत्यू…

Comments are closed.