अपघात: मुख्य बाजारात भरधाव ऑटो महिलेचा अंगावर पलटी

महिला गंभीर जखमी, जटाशंकर चौकातील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जटाशंकर चौकातील एका सेलच्या समोर एका महिलेच्या अंगावर ऑटो पलटी झाला. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ऑटोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरती रामदास दख्खनकर (45) या वणीतील रंगारीपुरा येथील रहिवासी आहे. त्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी जटाशंकर चौकातील एका सेलमध्ये त्या खरेदीसाठी गेल्या होत्या. सेलमध्ये खरेदी करून त्या सेलच्या पाय-या उतरून रस्त्यावर आल्या. दरम्यान त्याच वेळी आंबेडकर चौकातून एक ऑटो (MH29 v 7629) जटाशंकर चौकाच्या दिशेने येत होता.. दरम्यान ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले व ऑटो महिलेच्या अंगावर पलटी झाला. महिला ऑटोखाली दबल्या गेली. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. दरम्यान ऑटोचालक हा नियंत्रणात नसल्याचे बोलले जात आहे. यावेळी घटनास्थळावरील लोकांनी त्याचा चांगलाच समाचार घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती महिलेच्या मुलाला देखील देण्यात आली. जखमी महिलेला आधी वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यास आले.

महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून आरोपी ऑटोचालकाविरोधात या प्रकरणी आरोपी ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास महिला हेड कॉन्स्टेबल सीमा राठोड करीत आहे.

आधी झाल्या प्रेमाच्या आणा भाका, ब्रकअपनंतरही म्हणतो जुळव टाका

Comments are closed.