रजानगर परिसरातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी केले मोठे धाडस, मोठा अनर्थ टळला

बहुगुणी डेस्क, वणी: शनिवारच्या दुपारची जवळपास तीन वाजताची वेळ होती. यात्रा मैदानालगत रजानगर परिसरात भंगाराचे दुकान आहे. यातील मैदानावर असललेल्या भंगाराला अचानक आग लागली. या दुर्घटनेत वणी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. जवळच गॅसचे सिलिंडर होते. त्याचा जर विस्फोट झाला असता, तर खूप मोठी दुर्घटना झाली असती.

मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी ते सिलिंडर ताबडतोब दूर केले. आणि मोठी दुर्घटना टळली. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यासोबतच आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. शुक्रवारीदेखील नांदेपेरा मार्गावर अशीच आग लागली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज शनिवारी या भंगार दुकानाला आग लागताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. पाहता पाहता बघ्यांचीही गर्दी झाली. वृत्त लिहेपर्यंत अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत मोहम्मद रफीक शेख यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणती नुकसान झाले नाही.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सिगारेट किंवा कचरा जळाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. फायर ऑफिसर नंदू बेलसरे यांच्या मार्गदर्शनात फायर फायटर दीपक वाघमारे, आशुतोष जगताप, प्रीतेश गौतम, शुभम टेकाम व वाहनचालक देविदास जाधव यांनी आग आटोक्यात आणली.

Comments are closed.