कलांचा अविष्कार, थोडासा थरार, कडक षटकार आणि बरंच काही….

लोकमान्य टिळक महाविद्यालयात रंगला 'युवा भरारी' महोत्सव

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालय इथल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा विषयक उपक्रमांसाठी प्रसिद्धच आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनाला व कल्पकतेला वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वर्षभर विविध उपक्रम सुरूच असतात. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच ‘युवा भरारी’ हा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव झाला.

या महोत्सवाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी सहसचिव अशोक सोनटक्के, प्राचार्य डॉ. प्रसाद खांजोडे आणि मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव झाला. विद्यार्थ्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना विशाल व सुयोग्य मंच मिळावे यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात ‘युवा भरारी’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुष्पगुच्छ सजावट स्पर्धा झाली. यात प्रथम प्रणाली सरवर, द्वितीय कामाक्षी अंबुलकर तर तृतीय आयशा शेख आल्यात. रांगोळी स्पर्धेत प्रथम सुषमा डाहुले, द्वितीय सलोनी डाहुले, तृतीय पूजा बांडुरकर / संजना चौधरी विजेत्या झाल्यात. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांकावर शिफा सिद्धीकी, द्वितीय क्रमांकावर आयशा शेख, तर तृतीय क्रमांकावर लौकिता देठे यांनी गाजविली. मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांकावर प्राची उईके, द्वितीय क्रमांकावर आचल ठावरी, तृतीय क्रमांकावर पायल बेजापवार यांनी रंग भरलेत. वादविवाद स्पर्धा प्रथम क्रमांकावर गौरव रामटेके, द्वितीय क्रमांकावर आचल ठावरी, तृतीय क्रमांकावर पायल बेनापवार यांनी गाजवले.

पोस्टर प्रेझेंटेशन्न स्पर्धेत प्रथम क्रमांकावर सलोनी डाहुले, द्वितीय क्रमांकावर समीक्षा पारधी, तृतीय क्रमांकावर कामाक्षी अंबूलकर राहिल्यात. बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम गौरव रामटेके, द्वितीय देवान पारखी, तर मुलींमध्ये प्रथम समीक्षा खुसपुरे, द्वितीय कशीश कुकडेजा विजेता ठरलेत. कॅरम स्पर्धेत मुलांत अमर डाहुले, द्वितीय अक्षय क्षीरसागर तर मुलींत प्रथम नंदिनी पचारे, द्वितीय अनुष्का क्षीरसागर विजेत्या ठरल्यात. सुगम संगीतात श्रेया मत्ते, द्वितीय तृप्ती जुमडे, तृतीय चंचल मडावी होत्या. एकलनृत्यात प्रथम प्रगती जांभूळकर, द्वितीय मोनिका जाधव, तृतीय सोनम कुडुपो विजेत्या ठरल्यात.

क्रिकेट प्रथम बीएससी व एमएससी, द्वितीय बीकॉम फायनल, बेस्ट बॅट्समन तौसिफ खान, बेस्ट बॉलर अनिकेत दोडके, क्रिकेट मुलींत प्रथम बीएससी भाग एक, द्वितीय एनसीसी- बी, व्हॉलीबॉल मुले प्रथम बीकॉम फायनल, द्वितीय बीएससी व एमएससी, व्हॉलीबॉल मुली प्रथम एनसीसी- बी, द्वितीय बीए फायनल विजेता राहिलेत.

कबड्डी मुले- प्रथम बीए फायनल, द्वितीय बीकॉम फायनल, कबड्डी मुली – प्रथम बीकॉम एक, द्वितीय एनसीसी ए, बॅडमिंटन मुले- प्रथम शंकर गिरटकर, द्वितीय क्रिश मिस्त्री राहिलेत. बॅडमिंटन मुली – प्रथम धम्मरूचा दारुंडे, द्वितीय ऋतुजा रामगिरवार राहिल्यात. रील मेकिंग प्रथम तनुश्री दारुंडे, द्वितीय मोहन परगे, तृतीय अश्विनी डाहुर्ले होत्या.

समूह नृत्य स्पर्धेतप्रथम मोनिका जाधव व पल्लवी वाभीटकर, द्वितीय कृतिका मेश्राम आणि समूह विजेता ठरलेत. तृतीय नीलिमा खातरते आणि समूह जिंकलेत. आनंद मेळाव्यात प्रथम भारती राजुरकर, द्वितीय समीक्षा पारधी, तृतीय वैष्णवी बुऱ्हाण यांनी रसिक खवय्यांना खूश केलं.

विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अभिजित अणे आणि क्रीडा अधिकारी उमेश व्यास यांच्या मार्गदर्शनात डॉ. संघदीप उके, प्रा. प्रवीण गोसावी, प्रा. बाळा मालेकर, डॉ. प्रशांत लिहितकर, प्रा. अंजली आत्राम, डॉ. आदित्य शेंडे, प्रा. राहुल ठेंगणे यांनी विविध स्पर्धांचे आयोजन यशस्वी केले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर उरकुंडे, विजय उपाध्ये, पंकज सोनटक्के, संजय बिलोरीया, भदुसिंग वडते, आनंद नगराळे, जयंत त्रिवेदी, ईश्वर, नितेश चामाटे, कार्तिक देशपांडे, राहुल करमरकर, गणेश लोणारे तथा सांस्कृतिक विभाग, रा.से.यो विभाग, क्रीडा व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments are closed.