उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची गोतस्करावर धाड
सुशिल ओझा, झरी: वणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व त्यांच्या पथकाने १६ मार्च ला रात्री २ ते २.३० च्या दरम्यान माथार्जुन ते सुर्दापूर मार्गावरील आश्रम शाळेजवळ कत्तलीसाठी तेलंगणात घेऊन जाणारे ४१ जनावरे पकडली. या प्रकरणी जनावर मालकासह सात जणांना अटक करून कार्यवाही करण्यात आली आहे. पकडलेली सर्व जनावरे रासा येथील श्रीराम गौशाला मध्ये टाकण्यात आली आहे.
पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत मारेगाव, बोरी, करंजी, वणी, नागपूर, कळंब, पांढरकवडा, येथील जनावर तस्कर पायदळ व चारचाकी वाहनाने दिग्रस पैनगंगा नदीच्या पुलावरून नेली जाते. गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवस वरील गावातून खुलेआम जनावर तस्करी केली जाते. याची टीप उपविभागीय अधिका-यांना मिळताच त्यांनी गुरुवारी रात्री कार्यवाही केली.
या प्रकरणी जनावर मालक शेख महमूद अंजु कुरेशी (२८) रा. उमरी (केळापूर), मोहमद आरिफ शे,सादिक रा पाटणबोरी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह मजूर मोहम्मद महमूद कुरेशी (५०), अनिल सीताराम राठोड (४८), रमेश गंगाराम जवादे (६१), अहेमद खा उस्मान खा (४५), सर्व राहणार पाटनबोरी, तर परशुराम खुशाल पेंदोर (४९) रा माथार्जून, सुभाष मनोहर गेडाम (५०) मांडवी ता झरी, शालीक हरदास दडाजे (३५) रा टाकडखेड ता मारेगाव यांच्यावर गौरक्षण कायदा १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी विजय लगारेसह आशिष टेकाडे, रवी इसनकर,संतोष कालवेलवार यांनी केली असून पुढील तपास पी एस आय प्रफुल हे करीत आहेत. झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत राजरोसपणे जनावर तस्करी सुरु असून याबाबत कार्यवाही करण्यात पाटण पोलीस अपयशी ठरली होती. जनावर तस्करीला पोलिसच हातभार लाऊन पैसा उकळण्यात धन्य मानून जनावर तस्करीला साथ देत होती. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर उपविभागीय पोलीस अधिका-यांनी कार्यवाही केली. या पायदळ कार्यवाहीनंतर तेलंगणात जाणाऱ्या चारचाकी गाड्यांना पकडण्याचे सुद्धा मोठे आवाहन आहे.