रिकामटेकड्या दारुड्या नव-याची पत्नीला काठीने बेदम मारहाण

पत्नी जखमी, पतीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: दारुड्या पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नी जखमी झाली. सोमवारी संध्याकाळीी तालुक्यातील पुरड (नेरड) येथे ही घटना घडली. पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता (26) ही पुरड (नेरड) येथील रहिवासी असून ती गावातच तिच्या पती व एका 4 वर्षांच्या मुलीसह राहते. पीडितेच्या पतीला दारुचे व्यसन आहे. दारुचे व्यसन असल्याने तो काम धंदा देखील करीत नाही. दारु पिल्यावर तो पत्नीला नेहमी शिविगाळ करीत मारहाण करतो. सोमवारी दिनांक 10 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास पीडिता ही घराच्या अंगणात बसून होती. त्यावेळी तिचा पती दारू पिऊन घरी आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरी येताच पतीने पत्नीला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. पत्नीने विनाकारण शिविगाळ का करता म्हणून विचारणा केली असता पतीला राग आला. त्याने बाजूला पडून असलेली लाकडी काठी उचलली व पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पत्नीच्या पायाला, खांद्याला व पाठिला मार लागला.

माझी चुकी नसताना मला का मारले अशी तिने पतीला विचारणा केली. मात्र पती आणखी चिडला. त्याने तू आता इथे राहायचे नाही असे म्हणत पत्नीला पुन्हा शिविगाळ केली. पत्नीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी पती विरोधात बिएनएसच्या कलम 118 (1) व 352 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

बालकावर भटक्या कुत्र्याने केला भयंकर हल्ला

Comments are closed.