पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुकुटबन ग्रामपंचायत सरसावली

0

सुशिल ओझा, झरी: झरी तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यी ग्रामपंचायत मुकुटबन असून गावाची सुमारे 15 हजार लोकसंख्या आहे. मुकुटबन ग्रामपंचायत अंतर्गत ४ बोअरवेल द्वारे व पैनगंगा नदीतून भारत निर्माण योजने अंतर्गत पाणी पुरवठा सुरु आहे. पण ४ बोअर पैकी १ बोअरच्या पान्याची पातळी खालावल्याने बंद पडली. ज्यामुळे वार्ड क्र. २ मध्ये पाणी पुरवठा करण्याकरिता ग्रामपंचतीला अडचण निर्माण झाली होती. याचा अनुषंगाने सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार व ग्रामपंचायत सदस्यांनी वॉर्ड क्र २ मध्ये १३ मार्च ला बोअरवेल मारून पाण्याची समस्या मिटवली आहे. ज्यामुळे उन्हाळ्यात जनतेला होणारी पाण्याकरीता होणारी पायपीट थांबणार आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडल्याने नदी, नाले, तलाव, हँडपम्प, आतापासूनच कोरडे पडले आहे. ज्यामुळे मे व जून पर्यंत जनतेला पाणी पुरवठा करण्याची एक मोठी समस्या ग्रामपंचायत पुढे राहणार आहे. १५ हजार लोकसंख्या असलेल्या मुकुटबन गावाचा प्रश्न मोठा गंभीर असून ग्रामपंचायतला मोठी कसरत करावी लागणार आहे. पैनगंगा नदी कोरडी होण्याच्या मार्गावर आहे ज्यामुळे पाण्याची समस्या उद्भवणार आहे. कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून शंकर लाकडे यांचे नाव प्रचलित आहे. मुकूटबन गावाला पाण्याची कमी पडू देणार नाही त्यासाठी मी व माझी पूर्ण ग्रामपंचायत बॉडी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

वॉर्ड क्र २ मध्ये बोअर मारतेवेळेस पूजा करून सुरवात करण्यात आले त्यावेळेस सरपंच शंकर लाकडे ,उपसरपंच अरुण आगुलवार, सुनीता कल्लूरवार, रामदास पारशीवे, अशोक कल्लूरवार, बापूराव पुल्लीवार, सत्यनारायण एमजेलवार, मधुकर चेलपेलवार, दिपचंद तातेड, रमेश पोलचेटीवार, अरुण चिटलावार, गणपत कल्लूरवार, प्रभाकर कल्लूरवार ,संजय पारशीवे, श्रीनिवास संदरलावार सह अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.