सुवर्णसंधी – भंगारच्या भावात दुचाकी, कार, ट्रक इ. वाहनं घेण्याची संधी
बुधवारी स. 11 वा. वणी पोलीस ठाण्यातील जप्तीच्या वाहनाचा जाहीर लिलाव
बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या काही काळात केलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या वणी पोलीस स्टेशनमध्ये उभ्या आहेत. या वाहनांवर कुणीही दावा न केल्याने बुधवारी दिनांक 19 मार्च रोजी या 90 वाहनांचा लिलाव होणार आहे. सकाळी 11 वाजता वाहनांच्या जाहीर लिलावाला सुरुवात होणार आहे. पोलीस स्टेशनच्या लिलावात भंगारच्या भावात ग्राहकांना वाहनं खरेदी करता येतात. त्यामुळे या जाहीर लिलावात अधिकाधिक भंगार व्यावसायिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वणी पोलीस ठाण्याद्वारे करण्यात आले आहे.
सन 2021 पासून मधील विविध गुन्ह्यांमध्ये वाहनं ताब्यात घेतली जाते. ही वाहनं आवश्यक ते कागदपत्रे दाखवून सोडवावी लागते. मात्र अनेकदा या वाहनावर दावा केला जात नाही. त्यामुळे असे वाहनं पोलीस स्टेशनच्या आवारात उभे राहतात. अनेकदा केवळ जंग लागून ते खराब देखील होण्याची भीती असते. त्यामुळे पोलीस ठाण्यातर्फे अशा वाहनांचा लिलाव करण्यात येतो.
कोणती आहेत वाहनं?
जप्तीचे वाहनं हे सुस्थितीतील असते. त्यामुळे अनेक भंगार व्यावसायिक या लिलावाची वाट पाहत असतात. लिलाव होणा-या वाहनांमध्ये मोपेड, स्कूटर, भंगारासह टीव्हीएस व्हिक्टर, हिरोहोंडा स्प्लेंडर, होंडा पॅशन, ऍपे, ओमनी, टिप्पर, ट्रक, टाटा मालवाहक, कार इत्यादी वाहनांचा समावेश आहे. हे वाहन लिलावानंतर स्क्रॅप करून हस्तांतर केले जाते.
तत्पुर्वी वाहनावर हक्क सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. लिलावा आधी कागदपत्राची पूर्तता करून हक्क दाखल करता येणार आहे. त्यामुळे कुणाला क्लेम करायचा असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Comments are closed.