मोपेडच्या धडकेत गाभण म्हैस मृत्युमुखी, पशूपालकाचे नुकसान

गोकुळनगर ते लालगुडा मार्गावरील घटना, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: प्रत्येकाचं उदरनिर्वाहाचं एकेक साधन असतं. त्यावर तो आपलं आयुष्य कंठत असतो. मात्र या साधनावरच घाला घातला तर, त्याचं जगणं विस्कळीत होतं. पशुपालक असलेल्या गोकुळनगर येथील विजय बोदर मोरे (32) यांना मानवी चुकीमुळे आपली गाभण म्हैस सोमवार दिनांक 24ला गमवावी लागली. यामुळे फिर्यादीचे अंदाजे 1 लाख रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची तक्रार मोरे यांनी वणी पोलीस ठाण्यात केली.

तक्रारीनुसार गोकुळनगरातील विजय बोदर मोरे (32) यांचा दूध विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 10 म्हशी आहेत. सोबतच त्यांनी एक शेत मक्त्याने केले आहे. तिथे ते आपल्या म्हशी चारतात.सोमवारी सकाळी अंदाजे 6.00 वाजताच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या म्हशी घराच्या रस्त्याने लावल्यात. काही कामानिमित्त ते शेतातच थांबलेत. त्यांचे काम झाल्यावर ते लालगुडा रोडने म्हशीच्या मागे निघाले. तेव्हा त्यांना त्यांची एक गाभण म्हैस रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली दिसली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी तिथे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी कळलं की, त्यांच्या म्हशीला MH 29 CF 7584 क्रमांकाच्या एका मोपेड जुप्यीटर गाडीच्या चालकाने जबर धडक दिली. काही वेळात त्यांची माझी म्हैस तडफडत मेली. यावरून फिर्यादीने वणी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. त्यावरून अज्ञात आरोपीवर कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या आरोपीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली.

Comments are closed.