महिलांनी पाळण्याच्या दोरी ऐवजी आर्थिक दोर धरावी: अहीर
वणी/विवेक तोटेवार: महिलांनी चूल आणि आणि मूल इथपर्यंतच मर्यादित न राहता आता महिलांनी कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीही समोर यावे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. पंचायत समिती वणी द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी वणीतील एस बी हॉल येथे महिला मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
शनिवारी 12 वाजता वणीतील एस बी हॉलमध्ये पंचायत समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. ज्यामध्ये तालुक्यातील अनेक महिला बचत गटांच्या आपला सहभाग दर्शवीला. वणी पंचायत समिती अंतर्गत 495 बचत गट असून 159 बचत गटांना 15000 रुपये भांडवल देऊन त्यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. अशी माहिती पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांनी दिली.
पंचायत समितीच्या सभापती सौ लिशा विधाते यांनी महिला सशक्तीकरणाबाबत आपले विचार मांडले. शिवाय महिला सरकारी नोकरी मोठ्या प्रमाणात करतात परंतु आता महिलांनी व्यवसायातही उतरून महिला शक्ती दाखवावी असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान हंसराज अहीर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. पंचायत समितीद्वारे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत ज्या गावात 10 बचत गट किंवा त्यापेश अधिक बचत गट आहेत त्यांना 4लाख 60 हजार रुपयांचा निधी टप्याटप्याने देण्यात येईल .वणी पंचायत समितीद्वारे आता सॅनिटरी नॅपकिन या उधोगबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये आता 25 गावांपैकी 15 गावांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. अशी माहिती पंचायत समितीच्या सदस्यांनी दिली.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर , आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पंचायत समिती उपसभापती संजय पिंपलशेंडे , डॉ विकास कांबळे, कोसे साहेब गटविकास अधिकारी , बंडू चांदेकर, वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे ,पंचायत समिती सभापती सौ लिशा विधाते, मंगला पावडे, चंद्रदिती शेंडे,वर्षा पोतराजे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक माधुरी कांबळे,निर्मला कुचनाके उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती लिशा विधाते ,संचालन निशा वाटेकर तर अल्का काळे यांनी उपस्थितांचे व पाहुण्यांचे आभार मानले.