पोलीसांच्या प्रयत्नांतून लाखों रूपयांचा ऐवज मूळ मालकांना परत

अमरावती परिक्षेत्राचे विशेष आयजी रामनाथ पोकळे यांच्या हस्ते वितरण

विवेक तोटेवार, वणी: अनेकदा घरफोडी किंवा चोरीच्या घटना होतात. त्याची रीतसर तक्रार पोलिसांत नोंदवली जाते. त्यावर पोलीस बुद्धी आणि बळाचा वापर करून तो ऐवज व रक्कम परत मिळवण्यात यशस्वी होतात. असाच लाखो रूपयांचा ऐवज पोलिसांच्या चातुर्य आणि परिश्रमाने परत मिळाला. यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात अमरावती परिक्षेत्राचे विशेष आयजी रामनाथ पोकळे यांच्या हस्ते चोरी गेलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला.

फेब्रुवारी महीन्यातली घटना आहे. महिन्याच्या पहील्या आठवड्यात शहरातील साधनकर वाडीतील विमा कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी प्रदीप चिंडालीया यांच्याकडे घरफोडी झाली. त्यात एकुण 14 लाख 80 हजार रूपयांचा माल चोरट्यानी लंपास केला होता. तसेच 6 डिसेंबरला येथील जिॅल्हा परिषद कॉलनीतील कमलबाई भुसारी यांच्याकडेदेखील चोरी झाली होती. त्यात 9 तोळे सोने व 45 हजार रूपये रोख चोरट्याने लंपास केले होते. दोन्ही गुन्ह्यांच्या आरोपींना वणी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हा चोरी झालेला माल ताब्यात घेऊन उज्ज्वला प्रदीप चिंडालिया यांना 142.25 ग्रँम सोने व 47.760 ग्रँम चांदी देण्यात आली. तर कमळ बाळकृष्ण भुसारी यांना 89.140 ग्रॅम सोने परत देण्यात आले. या वेळी वणी पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर उपस्थित होते. वणी पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.