तुर चोरी व धान्य जाळल्यावरून परस्परांविरुद्ध तक्रार
सुशील ओझा, झरी: शेतातील तुर चोरल्याची घटना भेंडाळा शिवारात घडली. तर मांगली परीसरात धान्य जाळल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर तक्रार दाखल करण्यात आली असून भेंडाळा आणि माजरी येथील पाच जणांवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भेडाळा येथील फिर्यादी पुष्पा गजानन आत्राम या महिलेचे शेत मांगली शिवारात आहे. त्यात गहू व चणा पीक कापण्यात आला होता. आरोपी यशवंत शिवाजी घोडाम रा. भेंडाळा याने रात्री १० वाजता शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली व गावकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी फिर्यादी पुष्पा आत्राम शेतात गेली असता तिला कापलेले धान्य दिसले नाही. तिने १० पोते गहू २० हजार व १२ पोते चणा ३२ हजार असा एकूण ५२ हजारांचे धान्य यशवंत घोडाम यांनी चोरून नेल्याची पोलिसांत तक्रार दिली. यावरून घोडाम विरुद्ध ३७९, ५०६ व ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तर फिर्यादी यशवंत शिवाजी घोडाम याचेही शेत मंगली शिवारात आहे. शेत सर्वे नं ८२ मधील गहू कापून चुलत बहिणीच्या शेतात १३ मार्च ला ठेवला होता. १५ मार्चच्या रात्री ११ वाजता दरम्यान आरोपी पुष्पा गजानन आत्राम, प्रमोद गजानन आत्राम, दीपाली गजानन आत्राम, व संध्या भरत सिडाम यांनी शेतातील २५ क्विंटल गहू पेटवून ६० हजारांचे नुकसान केले अशी तक्रार घोडाम यांनी दिधमली. या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी कलम ४३५, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
फिर्यादीची मानलेली बहीण पुष्पा गजानन आत्राम रा. माजरी जि. चंद्रपूर ही दोन दिवसांपुर्वी घरी आली होती. घोडाम याने तक्रारीत म्हटले आहे की तिचे नाव सातबर्यावर चढविलेस आहे. तिचे नाव सातबऱ्या वरून काढण्यासाठी तिने वरीष्ठांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे नुकसासन करण्याचा हेतुने गहु पेटवला असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गुलाब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय नितीन चुलपार व जमादार प्रवीण ताडकोकुलवार करीत आहे.