वीज कोसळून शेतकऱ्याचा करूण अंत

झरी तालुक्यातील वाढोणा (बंदी) येथील दुर्दैवी घटना

बहुगुणी डेस्क, वणी: निसर्गाचा कोप कुणावर कसा होईल, हे सांगता येत नाही. अशाच विदारक कोपाचा बळी झरी तालुक्यातील एक शेतकरी ठरला. झरी तालुक्यातील वाढोणा (बंदी) येथील शेतकरी वसंता नरसिंग चव्हाण (37)नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. वातावरण थोडे ढगाळ झाले होते.

Podar School 2025

वणीसह काही भागांत थोडा पाऊसदेखील आला. विजांचा कडकडाटही झाला. निसर्गाने अचानक आपले रूप पालटले. आज गुरुवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान त्यांच्यावर अचानक वीज कोसळली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि चिमुकली दोन लेकरं आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.