अखेर राज्यमार्गाच्या कामासाठी बॅचमिक्स डांबर गिट्टीचा वापर

0

सुशील ओझा, झरी: वणी ते मुकुटबन राज्यमार्ग क्रमांक 315 चे रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हिवरदरा ते खडकी या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे डांबर गिट्टीचा वापर करून रस्ता तयार करण्यात येत होता. याविषयी ‘वणी बहुगुणी’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब उघडकीस आणली होती. अखेर शासलाला जाग आली व गणेशपुर ते मुकुटबन रोडवर दुसरा डांबर कोट बॅचमिक्स डांबर गिट्टीचा वापर करून रोड चे काम सुरु झाले आहे.

वणी ते मुकुटबन राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तर हिवरदरा ते खडकीपर्यंतच्या रस्त्याचे कामही अद्याप सुरू आहे. खडकी ते हिवरदरा या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ठ दर्जाचे डांबर व गिट्टीचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले होते.

ठेकेदाराचे बॅचमिक्स प्लांट मोहदा येथे असून प्लांटचे काम संथगतीने चालू होते. त्यामुळे रोड बनवण्यास उशीर लागत होता. मोहदा येथील प्लांटमधून हॉटमिक्स प्लांट मधून डांबरगिट्टी ट्रक द्वारे भरून आणून रोडचे काम सुरु केले होते. काम संधगतीने सुरु असल्याने गणेशपूर वासियांनी आंदोलन केले होते. गणेशपूर वासियांच्या आंदोलनानंतर हिवरदार ते खडकी या मार्गाचे काम सुरु झाले. हा रोड बॅचमिक्स प्लांटचा डांबरमिक्स गिट्टी वापरून तयार करणे गरजेचे होते. ज्यामुळे रस्ता मजबूत व टिकाऊ बनते. परंतु ठेकेदार व शासकीय बांधकाम विभागाच्या मुजोर धोरणामुळे कुणालाही न जुमानता बॅचमिक्स ऐवजी हॉटमिक्स डांबरगिट्टीचा वापर करून सुरू केले होते. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा रोड बनत होता. याकडे लोकप्रतिनिधी सह वरिष्ठ अधिकारी झोपेचे सोंग घेऊन होते. अखेर प्रशासनाला जाग आली.

गणेशपुर ते मुकुटबन रोडवर दुसरा डांबर कोट बॅचमिक्स डांबर गिट्टीचा वापर करून रोडचे काम सुरु झाले. तसंच बॅचमिक्स प्लांटही मोहदा येथे सुरु झाला आहे. खडकी ते हिवरदरा पाच किमी च्या रोडकमात बॅचमिक्स ऐवजी हॉटमिक्स गिट्टीचा वापर करून पहिला थर चा रोड करण्यात आला ज्यामुळे शासणाची दिशाभूल करण्यात आली होती. याची चौकशी करून संबंधीत अधिकारी व ठेकेदारावर कार्यवाही होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वणी-मुकुटबन राज्य मार्गात होणारे गैरप्रकार वणी बहुगुणीने वेळोवेळी उघडकीस आणले. तसेच बॅचमिक्स डाँबरगिट्टी चा वापर करण्यास भाग पाडले ज्यामुळे वणी बहुगुणीचे स्वागत होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.