पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये राडा

चौघे जखमी, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: घरा शेजारी राहणा-या एका तरुण, तरुणीने प्रेमविवाह केल्याने दोन कुटुंबांमध्ये चांगलाच राडा झाला. दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. या मारहाणीत तरुणाचे कुटुंबीय जखमी झालेत. याबाबत तरुणाच्या बहिणीने वणी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण करणा-या कुटुंबीतील 6 जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

वणीतील एका वार्डात हे दोन्ही कुटुंब राहतात. दोघेही घराशेजारीच आहे. दोन्ही कुटुंब एकाच जातीतील आहे. दोन्ही कुटुंबीयांमध्ये शेजारी असल्याने चांगलाच सलोखा होता. मात्र एका कुटुंबातील मुलगी व दुस-या कुटुंबातील मुलामध्ये जवळीक वाढत होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी सोबत जगण्या मरण्याच्या शपता घेतल्या. दुसरीकडे मुलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्या. अखेर तरुण तरुणीने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

20 दिवसांआधी हे प्रेमीयुगल पळून गेले. घरी माहिती झाल्यावर तांडव होणार याची कल्पना या प्रेमी युगलाला होती. त्यामुळे त्यांनी लग्न झाल्यावर परत येत पोलीस स्टेशन गाठले व याबाबत माहिती दिली. मुलीच्या कुटुंबीयांना समजवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मनात मुलगी पळून जाण्याची सल होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये 15 दिवसांपासून कुरबुरी सुरु होत्या. याचे टोक मंगळवारी गाठले गेले. मंगळवारी दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास मुलीच्या कुटुंबीत एका महिलेने शिविगाळ करण्यास सुरवात केली. त्यावरुन वाद वाढत गेला. महिलेने केस ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यामुळे मारहाण होणा-यात कुटुंबातील व्यक्ती मध्ये आल्यात. पुढे वाद वाढून दोन्ही कुटुंबातील व्यक्ती आमने सामने आलेत. एकाने सेंट्रिंगच्या पाटीने मारहाण केली. तर कुणी लाथा बुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या कुटुंबातील चौघे जण जखमी झालेत. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर मुलाच्या बहिणीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण करणा-या कुटुंबातील 6 व्यक्तींवर बीएनएसच्या विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

फक्त एका महिन्याच्या उन्हाळी शिबिरात चेसमध्ये एक्सपर्ट व्हा!

वणीत वादळाचा कहर… झाडे कोसळलीत, टिनपत्रे उडाली, पोल वाकले…

Comments are closed.