अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वणी-वरोरा रोडवरील घटना, ओळख पटवण्यासाठी आवाहन...

बहुगुणी डेस्क, वणीः शहरात रोजच नवनव्या घटना पाहायला व ऐकायला मिळत आहेत. त्यातच एक धक्कादायक प्रकार वणी-वरोरा रोडवरील नायगाव शिवारात सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज जवळ झाला. त्या परिसरातील एका शेतामध्ये शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. काही क्षणांतच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तर्क-वितर्कांना उधाण आलं. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळाली. लगेच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. मृतदेहाची पाहणी केली. नंतर तो मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केला. या इसमाची ओळख पटली नाही. त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांनी वणी पोलिसांना माहिती द्यावी. 9763304781 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.