झरी तालुक्यातील कर्तव्यदक्ष ग्रामसेवकांचा सत्कार
झरी (सुशील ओझा): यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातून सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात उत्कृष्ट ग्रामपंचायत कार्यकाळ व प्रशासन चालविणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रम यवतमाळ येथील बचत भवनात जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यातून सन २०१५-१६ करीता १३ ग्रामसेवक तर २०१६-१७ करीता १६ नावे पुरस्काराकरिता पात्र होते. त्यात झरी तालुक्यातील तीन ग्रामसेवक विजय उईके, कैलास जाधव, व प्रांजली वाढई या ग्रामसेवकाचे सत्कार करण्यात आला. विजय उईके यांनी मुकुटबन, कैलास जाधव यांनी अडेगाव तर प्रांजली वाढई यांनी वणी तालुक्यातील सावरला गावात उत्कृष्ट कार्यकाळ व प्रशासन सांभाळले ज्यामुळे यांचा करण्यात आला. प्रांजली वाढई सध्या झरी तालुक्यातील अडेगाव येथे कार्यरत आहे.
सत्कार करते वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, मुख्यकार्यकारी अधिकारी शर्मा, बांधकाम सभापती मिनिष मानकर,नंदिनी दरने, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, वित्त अधिकारीअरुण मोहोड,व नारायण सानप, राजेंद्र भुयार, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण,शिवाजी गवई, विस्तार अधिकारी इसलकर, तसेच जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.