विवेक तोटेवार, वणी: स्थानिक गुरुनगर येथील जनता शाळा रोड येथे चोरट्यांनी 3 लाखांची धाडसी घरफोडी केली. यात त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी टेबल फॅन, ताट वाट्या, पाणी गरम करण्याचा बंब, गुंड अशा छोट्या वस्तू देखील सोडल्या नाहीत. चोरटे इतके निवांत होते की त्यांनी सिलिंग फॅन देखील काढला. 2 मे रोजी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या घरफोडीने वणीकर त्रस्त असून जवळपास प्रत्येक घरी दोन तीन लाखांच्या वरचाच डल्ला चोरटे मारीत आहे. बंद घर म्हणजे घरफोडी हे एक समिकरण बनले असताना अद्यापही पोलिसांना चोरटे काही गवसत नाही. त्यामुळे वणीकर दहशतीत आले आहे.
वणीतील गुरुनगर येथील जनता शाळा रोड येथे हरीभाऊ झमाजी चिखले (82) राहतात. ते विवेकानंद शाळेतून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. ते काही दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून नागपूर येथे गेले होते. 2 मे रोजी जेव्हा ते परत आले. तेव्हा त्यांना घरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता त्यांना घरातील सोन्याची पोत 3.5 तोळे (2,00,000/- रुपये) सोन्याचा गोफ 1.5 तोळे (45,000/-रुपये) एक सोन्याचा गोफ 7 ग्रॅम व लॉकेट 1.5 ग्रॅम (30,000/- रुपये) तसेच सोन्याची अंगठी.
चोरटे होते भुरटे, सिलिंग फॅन गुंडही सोडला नाही
चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह टेबल फॅन, 02 सिंलीग फॅन, पाण्याची मोटर, ताब्याचे तीन गुंड व तीन लोटे. लहान मोठे तांब्याची पूजेचे गंगाळ, ताब्याचे पाणी गरम करण्याचे बंब, कास्याचे दोन ताट, दोन वाट्या, दोन प्लेटा, दोन चम्मच, दोन ग्लास, एक लोटा, पितळेचे सहा ताट, सहा वाट्या, सहा प्लेटा, आठ गंज, आठ ताटल्या, नऊ डब्बे, चार ग्लास, पितळेचे लहान मोठे सात गुंड, पितळेचा लोटा, पितळेची बकेट, पितळेची अत्तरदानी, तीन पितळेचे कोपर, एक पितळेची गंगाळ असा 3 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास केला.
चिखले गुरुजी काही वर्षांआधी नागपूर येथे शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे ते कधी नागपूर तर कधी वणीमध्ये राहतात. 15 दिवसांआधी नागपूरला गेले होते. 2 मे ला ते वणीला घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात बीएनएसच्या कलम 331(3), 331(4), 305(A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोउनी अश्विनी रायबोले करीत आहे.
शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू
सततच्या घरफोडीने वणीकर दहशतीत !
शहरात दिवसेंदिवस चोरी व घरफोडीच्या घटना वाढतच आहेत. सध्या लग्नाचा सिजन आहे. यासह मुलांना देखील सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक बाहेरगावी जातात. असे घर चोरट्यांच्या रडारवर आहेत. गेल्या 15 दिवसांपासून वणीत घरफोडीच्या सातत्याने घटना घडत आहे. विनायक नगर, चिखलगाव, लक्ष्मीनगर त्यानंतर गुरुनगर मध्ये जबरी घरफोडी झाली आहे. यात 3 ते चार लाखांपेक्षा अधिकचा डल्ला चोरट्यांनी मारला आहे. सध्या जे घर बंद असते ते घर फुटलेच असे एक समिकरण झाले आहे. सातत्याने होणा-या घरफोडीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Comments are closed.