मुली आणि महिलांसाठी मोठ्ठी खूशखबर, मोफत करिअर गायडन्स 14 पासून

ऑपरेशन प्रस्थान शिबिरात यवतमाळला निवास-भोजनाचीही मोफत व्यवस्था

बहुगुणी डेस्क, वणी: कुटुंबातील, नात्यातील किंवा समाजातील सीनियर सदस्य हे युवकांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र अनेकदा त्यासाठी योग्य पर्याय देत नाहीत. हे करू नको म्हटल्यावर, हे करू शकता असा पर्याय देणं आवश्यक आहे. नेमकी हीच बाब यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने लक्षात घेत ऑपरेशन प्रस्थान सुरू केलं.बेरोजगार युवती व महिलांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलानं ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत निशुल्क करिअर गायडन्स रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचं यवतमाळच्या एस.पी. कार्यालयासमोर आयोजन केलं आहे. हे मोफत प्रशिक्षण शिबिर बुधवार दिनांक 14 मे, गुरुवार दिनांक 15 मे व शुक्रवार दिनांक 16 मे असं तीन दिवस होईल. इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी पीएसआय आसोरे (9130035187) किंवा श्याम राठोड (7507224455) आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

शिबिरात, सायबर क्राईम, महिला विषयी कायदे, मोटिवेशन, करियर गायडन्स ,कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी इच्छुक मुली आणि महिला यांनी आजच वणी पोलिस ठाण्यात नाव नोंदवावं. जाण्याची व येण्याची व्यवस्था तसेच मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था, टी-शर्ट व पॅण्ट कीट मोफत मिळेल. आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट फोटो आणणे आवश्यक आहे.सोशल मीडिया, वाईट संगत आणि अन्य कारणांनी यवतमाळ जिल्ह्यातील युवक गुन्हेगारीकडे वळण्याची दाट शक्यता आहे. अनेक युवक हे भरकटलेले आणि वाममार्गाला लागलेले आहेत. काहींनी आपलं शिक्षणदेखील अर्ध्यातच सोडून दिलं आहे किंवा परिस्थितीमुळे त्यांना ते सोडून द्यावं लागलं. त्यांच्यासाठी हा आशेचा एक मोठा किरण ठरणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.