मंगलबाबू चिंडालिया यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
उद्या मंगळवारी 20 मे रोजी वणीत होतील अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: प्रख्यात व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते मंगलबाबू चिंडालिया(75) यांचे सोमवार दिनांक 19 मे रोजी रात्री 8-00 वाजता निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची अतिम यात्रा उद्या मंगळवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या कल्पना मार्बलमागे असलेल्या छोरीया लेआउटमधील निवासस्थानाहून निघेल. अंतिम संस्कार वणीतील मोक्षधाम येथे होतील.
गेल्या अनेक दशकांपासून ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तथा धार्मिक क्षेत्रातही सक्रिय होते. ते विदर्भ आंदोलन समितीचे आणि कॉंग्रेसचे आजीवन खंदे कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे 18 मार्च 1952 हा त्याचा जन्मदिवस होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा योगेश, सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. एक सत्शील आणि मनमिळावू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे.
Comments are closed.