23 मे पासून मारेगावात प्रथमच उन्हाळी संस्कार शिबिरासह स्पोकन इंग्लिशही

जगण्याचे विविध कौशल्य शिका, आजच 7038204209 नंबरवर नोंदणी करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणूनच उन्हाळी संस्कार शिबिर व स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजी संभाषणाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Birthday

या शिबिरात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. इयत्ता 3 री ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्याथी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी हे शिबिर अत्यंत सोयीचे आहे. हे शिबिर मारेगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे होईल. मारेगाव परिसर हा शेतकरी आत्महत्यांनी हादरलेला आहे. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील इच्छुक विद्यार्थ्यांना या शिबिरात वणीतील स्माईल फाउंडेशनच्या वतीने मोफत प्रवेश राहील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या शिबिरात बेसिक इंग्लिश म्हणजे पायाभूत इंग्रजीवर भर देण्यात येईल. इंग्रजी बोलण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या शिकवण्यात येतील. विद्यार्थ्यांकडून बोलण्याचा सराव करून घेण्यात येईल. नोंदणी 7038204209 या मोबाईल नंबरवर आजच नोंदणी करा.या शिबिरादरम्यान प्रत्येक शिबिरार्थ्याला प्रिंटेड नोटस् देण्यात येतील. सोबतच प्रत्येक शिबिरार्थ्याला रोजच्या प्रशिक्षणाच्या ऑडिओ क्लिप्स स्मार्टफोनवर पाठवण्यात येतील. या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल.

 

नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ सराव आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील. शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील. यात शिबिरार्थ्यांसाठी सहल होईल. शिबिरात इनडोअर, आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य, अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीकरण होईल. अधिक माहितीसाठी सागर जाधव यांच्याकडे 7038204209 या नंबरवर सकाळी 11ते 8 वाजेपर्यंत करता येईल. तेव्हा या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

 

जगण्याचं कौशल्य व ज्ञानगंगा घरोघरी

आजच्या काळात नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड संघर्ष आहे केवळ शिक्षण असून चालत नाही त्या सोबतीला सॉफ्ट स्किल्स असणंही तेवढंच आवश्यक आहे. वाचन, कम्युनिकेशन म्हणजे संवाद, स्टेज डेअरिंग, फेस रीडिंग, सोशल मॅनर्स, नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, ब्रेन एक्झरसाइज अशा अनेक गोष्टींची नितांत गरज आहे. त्यातही चांगलं इंग्रजी समजलं आणि बोलणं तेवढंच गरजेचं आहे. स्मार्ट सिटी च्या तुलनेत आपण बरेच मागे आहोत. म्हणूनच तेवढ्या गुणवत्तेचे प्रशिक्षण आपल्या भागातील विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून हे शिबिर आहे. ग्रामीण भाग बघता अत्यंत माफक असं शुल्क आकारण्यात येईल. त्यातही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना तर आम्ही मोफतच प्रवेश देणार आहोत.

                                                                                                    प्रा. सागर जाधव,

                                                                                           संचालक, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

Comments are closed.