बहुगुणी डेस्क, वणी: वणी उपविभागातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. सोमवारी दिनांक 19 मे रोजी कायर येथील एका युवा शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बंडू विठ्ठल गुरनुले (45) असे मृत शेतक-याचे नाव आहे.
बंडू हे कायर येथे आपल्या कुटुंबीयांसह राहायचे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. शेती व मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. सोमवारी दुपारच्या सुमारास घरी कुणी नसताना बंडू यांनी गळफास घेतला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच शेजा-यांनी व नातेवाईकांनी घरी गर्दी केली.
शिरपूर पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. बंडू यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा आत्प परिवार आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
Comments are closed.