पुरुषोत्तम नवघरे, वणी: पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरा बसला. डोळ्यांदेखत अनेकांचे जीव गेलेत. कधीही भरून न निघणारी अपरिमित हानी झाली. हे दुष्कृत्य करणाऱ्यांना भारतीय सैन्यानं चांगलाच धडा शिकवत अभूतपूर्व कामगिरी बजावली. दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देणारी ही भारतीय सेनेची गौरवशाली कामगिरी आहे.भारतीय सैन्याचं बळ केवळ शत्रुंनाच नव्हे तर संपूर्ण विश्वालाही अचंबित करणारं ठरलं. या धुरंधर भारतीय सैन्याप्रती कृतज्ञत व्यक्त करण्यासाठी वणीकर जनता आज गुरुवार दिनांक 22 मे रोजी एकत्र येत आहे. भारतीय सैन्याचे आभार मानण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दुपारी 4.00 वाजता तिरंगा सन्मान यात्रा काढणार आहे.
या रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्वांनी एकत्रीकरणासाठी बस स्टॅण्ड जवळील शासकीय विश्रामगृहात दुपारी 3.30 वाजता पोहचायचं आहे. तिथं रॅलीचं नियोजन व अन्य आवश्यक माहिती दिली जाईल. नंतर दुपारी 4.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथून रॅली सुरू होईल. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक – खाती चौक – गांधी चौक – संत गाडगेबाबा चौक – शहीद भगतसिंग चौक- नेताजी सुभाषचंद्र बोस चौक -सर्वोदय चौक – टागोर चौक – डॉ. आंबेडकर चौक या मार्गे जाईल. त्यानंतर या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात होईल. सैनिकांबद्दल असलेला अभिमान व कृतज्ञता व्यक्त करावी अशी विनंती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
Comments are closed.