मादगी समाजाची परंपरा जपणारे बापुराव चाटे काळाच्या पडद्याआड

आज शुक्रवार ला दुपारी 12 वाजता वणीतील मोक्षधाम होणार अंत्यसंस्कार....

बहुगुणी डेस्क, वणी: मुळात धानोरा (लिंगटी) येथील ज्येष्ठ नागरिक बापुराव यल्लन्ना चाटे (84) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते एकदा पडले होते. तेव्हापासून त्यांना बेडरेस्टच होती. त्यात प्रदीर्घ आजाराने गुरुवार दिनांक 26 जून 2025 ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार दिनांक 27ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहेत. तारुण्यातच त्यांनी मादगी समाजाची परंपरा जोपासण्यासाठी धडपड केली. समाजात त्यांचा आदर्श होता. त्यांची लोकप्रियता भौगोलिक सीमांच्या पलीकडची होती. त्यांचे नातू सूरज चाटे हे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या मागे मुलगा, मुली, जावई, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.