पन्नाशीतली माणसं जेव्हा पुन्हा लहान बालकं होतात…..

तब्बल 32 वर्षांनी वर्गातील दोस्त शाळेत एकत्र जमलेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शालेय जीवनात आपल्याला शाळा नकोशी वाटते. कधी आपण मोठे होऊन, शाळेतून सुटका होईल असंही वाटतं. मात्र मोठं झाल्यावर पुन्हा तीच शाळा आपल्याला बोलावते. त्या शाळेच्या हाकेला ओ देत 32 वर्षांनतर जुने दोस्त एकत्र आलेत. राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय विद्यालयातील 1993-94च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात आणि मोठ्या दिमाखात झाले. 32 वर्षांनी जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, आठवणींचा आनंद आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले.

कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी 1993-94चे कार्यरत शिक्षक चौधरी, गारघाटे, देशशेट्टीवर, धानोरकर, शिक्षकेत्तर कर्मचारी काकडे तसेच राष्ट्रीय विद्यालय चे मुख्याध्यापक खाडे उपस्थित होते. शिक्षकांनी आपल्या भाषणांतून जीवनातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. यावेळी 1993-94च्या विद्यार्थ्यांनी शाळेला बूक रॅक भेट दिली.

शंकर पाझारे, मोजेस कोमलवार यांच्यासह इतर अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. हास्यविनोदांचे वातावरण तयार केले. त्यांच्या सादरीकरणाने संमेलनात हास्याची लकेर उमटली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता भगत (तावाडे), अर्चना पुलजवार, बबिता भोंगाळे, अनिल जुमनाके, रवी कंदपुरीवार यांनी विशेष परिश्रम घेतले. संमेलनाचे मंच संचालन डाईक मडावी आणि अमूल्या कोमलवार यांनी अत्यंत सुरेखरित्या पार पाडले. हा कार्यक्रम आयोजन करण्याकरिता संगीता भगत (तावाडे), बबिता भोंगाळे आणि अर्चना पुलजवाऱ यांनी महत्वाची भूमिका बजावली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.